मी प्रसाद शिवाजीराव जोशी परभणी जिल्ह्यातील मानवत येथील रहिवासी आहे. मागील २० वर्षापासून मी मानवत येथील सामाजिक, सांस्कृतिक कार्यात कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. तसेच १५ वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे.
शैक्षणिक पात्रता
माहिती तंत्रज्ञान, पत्रकारिता आणि
राज्यशास्त्र या तीनही क्षेत्रांत उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. बी.सी.ए. पदवीसह
जनसंज्ञापन व पत्रकारिता विषयात पदवी आणि एम.जे.एम.सी. पदवी संपादन केली आहे.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण
केले असून 2023 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची SET
परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
कामाचा अनुभव
दैनिक तरुण भारत, सकाळ, दिव्य मराठी आणि सरकारनामा यांसारख्या
प्रतिष्ठित माध्यमांमध्ये प्रतिनिधी व स्तंभलेखक म्हणून कार्य करत राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय विषयांवरील वृत्तांकन व विश्लेषण केले आहे. सध्या के.के.एम.
महाविद्यालय, मानवत येथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. वृत्तलेखन,
लेखनकौशल्य, माध्यम व्यवस्थापन आणि सार्वजनिक
संपर्क ही प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत.
शैक्षणिक योगदान व लिखाण
राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये
संशोधन निबंध सादर करून माध्यमे आणि समाजपरिवर्तन यांसारख्या विषयांवर अभ्यासपूर्ण
मांडणी केली आहे. पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळांमध्ये सहभाग घेऊन व्यावसायिक
कौशल्ये विकसित केली आहेत. विविध वर्तमानपत्रांतील लेखांचा "विचार
समिधा"
हा संग्रह पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाला आहे.
सामाजिक जबाबदारी
m मानवत
येथील साने गुरुजी वाचनालयाच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून वाचनसंस्कृती आणि
सामाजिक प्रबोधनासाठी कार्यरत आहेत.
श्री
योगानंद महाराज स्थापित दत्त मंदिर विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून आध्यात्मिक
क्षेत्रात कार्यरत आहे.
मानवत
शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या शिक्षक पालक संघाच्या शारदोत्सव व्याख्यानमालेच्या
संयोजन मंडळात जबाबदारी पार पाडत आहे.
सांगली
अर्बन बँक शाखा मानवत येथे स्थानिक सल्लागार समिती सदस्य म्हणून कार्य करत आहे.
मानवत
शहराचा विकास व विशेषत: रेल्वे च्या प्रश्नाविषयी कार्यरत असणाऱ्या मानवत तालुका
विकास व रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातूनही कार्यरत आहे.
प पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्न असणाऱ्या मानवत तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
